एप्रिल २००८ मधे मी अमरावती या शहराला रामराम करून पुणे येथे स्थाइक झालो ३३ वर्षे बँकेत नोकरी केल्यावर मी स्वेछा निवृत्ति घेतली। काहीतरी सामाजिक कार्य आपल्या हातून व्हावे या हेतूने फिरत असताना श्री सुनील देवधर यांचे आवेशपूर्ण पण तळमळिचे प्रबोधन ऐकण्याचा योग आला अणि माझे शोध कार्य मला गवसले। ईशान्य भारत, आपल्याच माय - भूमिचा एक भाग पण तितकाच अपरिचित। अनेक दिग्गज व्यक्तिमत्वाचे विशाल कार्य करीत असलेले पण प्रसिद्धि पासून दूर असलेले लोक मला नंतर या कार्यात मग्न असलेले मला भेटले अणि में भरुन गेलो।
त्यांच्या सल्ल्याने मी रत्नागिरी येथे नागालैंड विद्यार्थी वसतीग्रह येथे २० दिवस राहून आलो आणी या कार्याला हातभार लावण्याचा माझा निश्चय पक्का झाला। त्याप्रमाणे मी २०/४/२००९ या दिवशी नागालैंड साथी प्रयाण करीत आहे।
पुर्वान्चालाचे आव्हान आणि आवाहन हे श्री सुनील देवधर यानी लिहिलेले आपल्या अनुभवाचे सार असलेले पुस्तक प्रत्येकानी वाचावे असेच। त्यातील काही निवडक भाग मी येथे देणार आहे। वयाच्या ५८ व्या वर्षी जे मला प्रथमच समजले ते आपल्या परीने लोकांपर्यंत जावे हाच उद्देश
Thursday, 26 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment