दररोज चालणारी घूसखोरी ही गटा गटाने होत असते। कधी हे गट ५० ते ६० इतक्या छोट्या संख्येत असतात तर मोठयात मोठा गट २०० प्रर्यंत ही असतो। बांगलादेशात व भारतात दोन्ही ठिकाणी यांची दलाली करणारे एजेंट्स असतात। घुस्खोराना भारतात शीर्न्यापुर्वी उड़िया , बंगाली (शुद्ध ), असमिया , हिन्दी भाषा शिकवण्याची केंद्रेही बांगालादेशाच्या सीमेवर या दलालानी निर्माण केली आहेत।
आज आसाम व त्रिपुरा च्या एकुण १३ जिल्ह्यांमध्ये ५०% पेक्षा अधिक लोकसंख्या बांगालादेशिंची झालेली आहे। सर्व भारतात घुसून बसलेल्या सुमारे दीड कोटींच्या आसपास असलेल्या बांगलादेशिंचा आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हां आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे। त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment