दररोज चालणारी घूसखोरी ही गटा गटाने होत असते। कधी हे गट ५० ते ६० इतक्या छोट्या संख्येत असतात तर मोठयात मोठा गट २०० प्रर्यंत ही असतो। बांगलादेशात व भारतात दोन्ही ठिकाणी यांची दलाली करणारे एजेंट्स असतात। घुस्खोराना भारतात शीर्न्यापुर्वी उड़िया , बंगाली (शुद्ध ), असमिया , हिन्दी भाषा शिकवण्याची केंद्रेही बांगालादेशाच्या सीमेवर या दलालानी निर्माण केली आहेत।
आज आसाम व त्रिपुरा च्या एकुण १३ जिल्ह्यांमध्ये ५०% पेक्षा अधिक लोकसंख्या बांगालादेशिंची झालेली आहे। सर्व भारतात घुसून बसलेल्या सुमारे दीड कोटींच्या आसपास असलेल्या बांगलादेशिंचा आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हां आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे। त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे।
Monday, 30 March 2009
Saturday, 28 March 2009
घुस्खोरिची कारणे
बांगालादेशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। या शतका अखेरीस ती २० कोटि पर्यंत जाण्याची शक्यता आहे। इतक्या लोकाना तेथे रहाणेच शक्य नाही । या शिवाय बांगलादेश जेंव्हा पूर्व पाकिस्तान होता तेंव्हा पश्चिम पाकिस्तान ने त्यांचे शोषण करून त्यांची अवस्था बिकट केली होती। भारत-बांग्लादेशामध्ये असलेली मैदानी सीमा २५०० मैल असून तेथे कसलेही बंधन व कुंपण नाही। त्यामुले घुस्खोरीवर नियंत्रण नाही। आपल्या देशातील विचीत्र कायदे देखिल घुस्खोरीला उत्तेजन देतात। उदा घुसखोर सिद्ध झाल्यास त्यास कायद्याने फार कमी शिक्षा आहे। कधी कधी तर ते साध्या जामिनावर ही सुटतात । हां कायदा अनेक वेळा घूसखोरी निदर्शनास आणून देणार्या व्यक्तिलाच अड़चणित आणतो। तसेच विदेशातून येणारा वारेमाप पैसा वापरून, आसाममधील जमीनी बलकाऊन तेथे घुस्खोराना वसवले जाते.
घुसखोरिची पार्श्वभूमी
आसामचे हे मैदानी क्षेत्र मुस्लिम बहुसंख्याक बनवण्याची 'दार-उल-इस्लाम ' ची योजना गेली ९३ वर्षे मुस्लिम नेत्यांद्वारे राबवली जात आहे। १९०६ साली ढाक्याचा नवाब सलिमुल्ला खान याने तत्कालिन भारतातील प्रमुख मुसलमान नेत्यांची बैठक बोलाऊन आसाम मधे मोठ्या प्रमाणावर मुसलमानानी जाउन स्थाईक होण्यासाठी उत्तेजन देण्याचे आवाहन केले। महम्मद अली जीना ची देखिल आसामला पूर्व पाकिस्तानात समाविष्ठ करून घेण्याची तीव्र इच्छा होती , पण ती पूर्ण न झाल्याने त्यानी आपला स्वीय सचिव मोईन उल हक़ चौधरी यास म्हटले होते , 'अजुन दहाच वर्षे थाम्ब। मी माझ्या स्वताहाच्या हाताने चांदीच्या तबकातून तुला आसामची भेट देऊ करीन।' त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी १९६८ मधे लिहिलेल्या 'मिथ ऑफ़ इन्देपेंदेंस' या पुस्तकात ते म्हणतात , 'काश्मीर हे भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारे एकच कारण नसून पूर्व पाकिस्तानाला (आताच्या बांगला देशाला ) लागुन असलेल्या भारतीय जिल्ह्यांचे कारणही तितकेच महत्वाचे आहे'
बांगलादेशी मुसलमानांची घूसखोरी
पुर्वान्चालातील सात राज्यांपैकी बरोबर मध्यभागी असलेला आसाम व बांगलादेशास लागून असलेला त्रिपुरा ही राज्ये बहुतांशी मैदानी राज्ये आहेत। निम्मा त्रिपुरा डोगरालही आहे पण तो भाग मिझोराम व बांगलादेशाच्या चकमाननि व्यापलेल्या चिटगांग हिल्सट्रैकला लागून आहे
प्रामुख्याने मैदानी असलेल्या या दोन्ही प्रदेशान्मधे घुस्खोरीने अक्राळ विक्राळ स्वरुप धारण केल्याचे दिसते । २ कोटि २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाम मध्ये आजमितीस ७५ लाख बंगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत। तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरा मध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले दिसते.

Thursday, 26 March 2009
माझ्या सामाजिक कार्याची सुरवात
एप्रिल २००८ मधे मी अमरावती या शहराला रामराम करून पुणे येथे स्थाइक झालो ३३ वर्षे बँकेत नोकरी केल्यावर मी स्वेछा निवृत्ति घेतली। काहीतरी सामाजिक कार्य आपल्या हातून व्हावे या हेतूने फिरत असताना श्री सुनील देवधर यांचे आवेशपूर्ण पण तळमळिचे प्रबोधन ऐकण्याचा योग आला अणि माझे शोध कार्य मला गवसले। ईशान्य भारत, आपल्याच माय - भूमिचा एक भाग पण तितकाच अपरिचित। अनेक दिग्गज व्यक्तिमत्वाचे विशाल कार्य करीत असलेले पण प्रसिद्धि पासून दूर असलेले लोक मला नंतर या कार्यात मग्न असलेले मला भेटले अणि में भरुन गेलो।
त्यांच्या सल्ल्याने मी रत्नागिरी येथे नागालैंड विद्यार्थी वसतीग्रह येथे २० दिवस राहून आलो आणी या कार्याला हातभार लावण्याचा माझा निश्चय पक्का झाला। त्याप्रमाणे मी २०/४/२००९ या दिवशी नागालैंड साथी प्रयाण करीत आहे।
पुर्वान्चालाचे आव्हान आणि आवाहन हे श्री सुनील देवधर यानी लिहिलेले आपल्या अनुभवाचे सार असलेले पुस्तक प्रत्येकानी वाचावे असेच। त्यातील काही निवडक भाग मी येथे देणार आहे। वयाच्या ५८ व्या वर्षी जे मला प्रथमच समजले ते आपल्या परीने लोकांपर्यंत जावे हाच उद्देश

ईशान्य भारत
सुनील देवधर यांचे मनोगत
ईशान्य भारतातील "सेव्हन सिस्टर्स " म्हणुन परिचीत असलेली राज्ये आज भारतातील सर्वाधिक संवेदनाक्षम व अशांत मानली जात आहेत । अरुणाचल प्रदेशाचा एक अपवाद सोडला तर फूटीर्तेच्या ज्वालामधुन उफाललेल्या दहशत वादाने नागालैंड , मणिपुर , मिजोराम, त्रिपुरा , मेघालय व असम या राज्यामधे सामान्य जनजीवन उध्वस्त करूँ टाकलेले दिसते । कुक्की-नागा, बोडो- सावताल इत्यादी जनजातीमधील अंतर्गत संघर्ष ही मोठ्या प्रमाणात चालू असल्याच्या बातम्या आपण इकडे ऐकतो। स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षे पूर्ण झाल्यावर ही आपल्या भारतातला हा एकमेव भाग असा आहे की जेथे गेली अनेक वर्षे सातत्याने १५ अगस्त व २६ जानेवारी ह्या दोन राष्ट्रीय सनान्च्या दिवशी बंद चे आवाहन केले जाते व तो यशस्वी करण्यासाठी अतिरेकी प्रयत्नशील असतात।
ही फूटिरता निर्माण करणारी कारणे कोणती आहेत हे समजने सर्वप्रथम आवश्यक आहे
फुटिरते ची कारणे
१) संपर्काचा अभाव २) उर्वरित भारत व पूर्वांचल यांमधील दुरावा ३) पुर्वान्चालातिल अंतर्गत संपर्काचा अभाव.
या विषयावर त्यांचे अधिक समालोचन मी देत राहीन

Subscribe to:
Posts (Atom)