Monday, 3 August 2009

सप्त भगिनी व प्रसार माध्यमे

प्रसार माध्यमानी या पुर्वान्चलाबद्दल परिपूर्ण जागरण करणे अतिशय गरजेचे आहे आज सर्व प्रसार माध्यमे पूर्वांचलातील फक्त दुर्घतनान्चिच माहिती उर्वरित भारतात पोचवतात पण त्याच बरोबर त्या घटनांची कारण मीमांसा करून त्यावरील उपायांबद्दल उर्वरित भारतियाँ मधे जन जागृति करणे देखिल तितकेच अगत्याचे आहे। या भागातील अनेक शहरांची नावे सामान्य भारतीयाला परदेशी वाटतात ही वस्तुस्थिति आहे । येथील भाषा , संस्कृति ,परम्परा , वेशभूषा , खानपान , आचार विचार यांच्या विविधतेची माहिती जन सामान्यां पर्यंत पोचवून ते या भागाकडे आकर्षित होतील या दृष्टीने प्रयत्न करणे हे देखिल प्रसार माध्यमानी आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणुन पार पाडले पाहिजे। काश्मीर पेक्षाही निसर्ग रम्य असलेल्या या प्रदेशाकडे उर्वरित भारतीय प्रवाश्याना आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रसार माध्यमे मोलाची कामगिरी बजाऊ शकतात। येथील निसर्ग रम्य येथील महापुरुष व त्यानी इंग्रजांशी केलेल्या प्रतिकाराबद्दल फार थोडी माहिती उर्वरित भारतियाना आहे ही खंत देखिल येथील लोकांमधे आहे। याबाबत देखिल प्रसारमाध्यमे पुढाकार घेऊ शकतात।