Friday, 19 June 2009

मेघालय कृष्ण मेघांच्या छायेत

पहिला ख्रिश्चन मिशनरी मेघालयाच्या पहाडातून वणवण भटकला त्याला दोन शतके पूर्ण होतील इतक या भागातील त्यांच काम जून आहे बंगालच्या सेरामपुर मिशनचा एक पादरी रेव्ह पाल याने १८१० ते १८१३ या कालात हां सम्बन्ध प्रदेश नीट अभ्यासला लिपिची उणीव लक्षात घेउन १८१३ मधेच त्यानी खासी भाषेला रोमन लिपि देण्याची कल्पना अमलात आणली अवघ्या १०-१५ वर्षात बायबल आणि न्यू टेस्टामेंट या ख्रिस्ती धर्मं ग्रंथाचा खासित अनुवाद ही करून घेतला

१८४१ मधे मेघालयात आलेला एक वेल्श मिशनरी थॉमस जोन्स याच्याकडे त्या वेळच्या ब्रिटिश सत्ताधार्यानी संपूर्ण चेरापूंजी जिल्ह्यात ख्रिस्ती मिशनरी शाला उघडण्याची कामगिरी सोपविली होती

याच कालात खासी नेता लाइ थांट याने स्वतः बंगाली भाषा शिकून आपल्या बांधवाना बंगाली लिहिण्या वाचण्यास शिकवायला सुरुवात केली होती । पण जोन्स च्या हाती शिक्षण खात एकवटल्यावर उ लाइ थांट च्या शाला बंद पडल्या मिशनर्यानि शाला काढताच सत्ताधारी ब्रिटीशानी सर्व विध्यार्थ्याना शालेत पाठवन पालकन्वर बंधनकारक केले। त्यातूनच ख्रिस्तिकरना च्या प्रक्रियेला नवी गति मिळाली

खासी जीवनशैली

मात्रुसत्ताक कुटुंब पद्धति ही खासी जीवन शैलीची खासियत खासी मूल आपल्या नावा माग आईच नाव लावतात सामान्यतः लग्न झाल्यावर नवर्यान आपल्या बायकोच्या घरी रहायला जाण्याची पद्धत आहे पुरुषाच्या तुलनेत स्त्री अधिक श्रेष्ठ अशा कल्पनेत रुजलेल्या या मत्रुसत्ताक पद्धतीत संपत्तीच्या वारसा बद्दल ही काही संकेत रुढ़ झालेले दिसतात खासी घरातल्या सर्वात लहान मुलीला "खातदुह" म्हणतात । सामान्यतः आईची संपत्ति या कनिष्ट कन्यकेला मिळते अर्थात भावंडा पैकी अन्य कोणी अधिक गरजवंत असेल तर त्या मात्रु सम्पत्तितला वाटा त्यानाही देण धाकट्या मुलीवर बंधन कारक मानल गेल आहे एकाच मातुल घरान्यातल्या व्यक्ति एकाच आडनाव लावतात खासी भाषेत मातुल घरान्याला "कुर" अस म्हणतात । या एका कुराच परम्परागत निवासी घर पिध्यान पिढ्या जपल जात

खासी धर्मं , खासी उपासना पद्धति ही हिंदू धर्माची लहान बहिण आहे अस व्यापक ख्रिस्तिकरनाशि दोन हात करण्याचा चंग बांधलेल्या सेंग खासी चलवलिच्या लोकांचे म्हनने आहे

मेघलायातिल रहिवासी

खासी किंवा गारो आणि जयंतिया काय सगल्यान्चेच इंग्रजी उच्चार अगदी अधर अस्पष्ट। खासी भाषेसाठी रोमन लिपि वापरतात त्यामुले अर्थ जरी नाही समजला तरी निदान रोमन स्पेलिंग वरून आपण उच्चार तरी करू शकू अशी माझी भोली समजूत होती पण उच्चारनाच्या फ्रंट वर विकेट जावी असे एकापेक्षा एक कठिन खासी शब्द आहेत उमंगोट आणि उमस्यु ही नद्यांची नावे काय किंवा उम्सोसुम हे शिलांग शहराच्या एक भागाचे नाव काय सारच दुर्बोध इथली नवे त्याहून ताण ही नावे ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षिण आशियाई देशात असा संभ्रम पडावा खासी नावे आपल्याला वेगळी काहीशी विचित्र वाटण स्वाभाविक आहे कारण मोन-ख्मेर या भाषा परिवारातली ही खासी आहे अस सांगतात की थाईलैंड आणि कम्बोडिया तील भाषांशी खासी भाषा मिलती जुलती आहे

Friday, 12 June 2009

मेघालय एक राज्य

२१ फरवरी १९७२ हां मेघालया चा जन्मदिवस अविभक्त आसामच्या बांगला देशाला लागुन असलेल्या दक्शिनेत्ल्या तीन जिल्ह्याना राजधानी शिलांग सह वेगळ काढून मेघालय हे नव राज्य निर्माण केल गेल इंदिरा गाँधी स्वतः या नव्या राज्याच्या निर्मीतीच्या सोहोळ्यला हजर होत्या विवेकशून्य राजकारण आणि हिंसा हे दोन पापग्रह पुर्वान्च्लात्ल्या पत्रिकेत असावेत

मेघालयात घुस्खोरिची समस्या नाही याला कारण इथली भौगोलिक परिस्थिति सुमारे ४०० किलोमीटर लांबीची मेघालयाची दक्षिण सीमा बांगला देशाला लागुन आहे तरी ती ओलांडून भारतात येणे अवघड आहे हां सगळा प्रदेश अतिशय दुर्गम आहे हे या मागचे कारण । चेरापूंजी ला गेलो असताना पठाराच्या टोकाला दूर खोल दरीत आम्हाला बांगला देश दिसत होता कातिव प्रस्तरान्च्या महाकाय रांगानी ही नैसर्गिक फालनीच घडवून आणली आहे इतकी अवघड की गिर्यारोहण करून सुद्धा बांगला देशी घुस्खोराना येता येऊ नये

मेघलायाची सफर

१९/४/२००९ ला पुणे ते मुंबई बस तिथून अमरावती रेलवे मग परत बस ने नागपुर ला २३ ला पोचलो तिथून मग २४/४/२००९ ला जेट लाईट विमानाने हावडा येथे संध्याकाळी ६ ला पोचलो । दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या विमानाने गोहाटी ला ८ वाजता पोहचून टैक्सी ने ११ वाजता शिलांग ला पोहचलो

शिलांग शहर म्हणजे नानाविध रंगांची मुक्त उधलन आहे हैप्पी वैली ओलांडून आपण शहराच्या वेशीवर येतो नि मग
डोंगर दर्यांच्या कड़े खांद्यावर विसाव्लेल अवघ शिलांग शहर हिंदस्तोवर आपण आनंदाच्या खोर्यातच असतो।

डोळे नीवतील अशा कंच हिरव्या घन राईचा कैनवास सगळ्या शहराला लाभलाय. त्यात निळ्या, तपकिरी नि ताम्बड्या रंगांची उतरती छप्पर मिरवनार्या घरांच्या रांगा म्हणजे नुसती रंगपंचमी ।

अडीच लाखाच्या आसपास शिलांग ची लोकवस्ती असून ८० टक्के साक्षरता असलेले हे शहर भारताच्या ६० टक्के साक्षर्तेच्या कितीतरी पुढे आहे । मेघालयाच्या राज्धानिच हे शहर देशातील सर्वाधिक पावसाचा हां चिमुकला प्रांत इथे वर्षातले ८ महीने पाउस । उन्हाल्यातिल कमाल तापमान २३ डिग्री