Friday, 12 June 2009

मेघालय एक राज्य

२१ फरवरी १९७२ हां मेघालया चा जन्मदिवस अविभक्त आसामच्या बांगला देशाला लागुन असलेल्या दक्शिनेत्ल्या तीन जिल्ह्याना राजधानी शिलांग सह वेगळ काढून मेघालय हे नव राज्य निर्माण केल गेल इंदिरा गाँधी स्वतः या नव्या राज्याच्या निर्मीतीच्या सोहोळ्यला हजर होत्या विवेकशून्य राजकारण आणि हिंसा हे दोन पापग्रह पुर्वान्च्लात्ल्या पत्रिकेत असावेत

मेघालयात घुस्खोरिची समस्या नाही याला कारण इथली भौगोलिक परिस्थिति सुमारे ४०० किलोमीटर लांबीची मेघालयाची दक्षिण सीमा बांगला देशाला लागुन आहे तरी ती ओलांडून भारतात येणे अवघड आहे हां सगळा प्रदेश अतिशय दुर्गम आहे हे या मागचे कारण । चेरापूंजी ला गेलो असताना पठाराच्या टोकाला दूर खोल दरीत आम्हाला बांगला देश दिसत होता कातिव प्रस्तरान्च्या महाकाय रांगानी ही नैसर्गिक फालनीच घडवून आणली आहे इतकी अवघड की गिर्यारोहण करून सुद्धा बांगला देशी घुस्खोराना येता येऊ नये

No comments: