Friday, 12 June 2009

मेघलायाची सफर

१९/४/२००९ ला पुणे ते मुंबई बस तिथून अमरावती रेलवे मग परत बस ने नागपुर ला २३ ला पोचलो तिथून मग २४/४/२००९ ला जेट लाईट विमानाने हावडा येथे संध्याकाळी ६ ला पोचलो । दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या विमानाने गोहाटी ला ८ वाजता पोहचून टैक्सी ने ११ वाजता शिलांग ला पोहचलो

शिलांग शहर म्हणजे नानाविध रंगांची मुक्त उधलन आहे हैप्पी वैली ओलांडून आपण शहराच्या वेशीवर येतो नि मग
डोंगर दर्यांच्या कड़े खांद्यावर विसाव्लेल अवघ शिलांग शहर हिंदस्तोवर आपण आनंदाच्या खोर्यातच असतो।

डोळे नीवतील अशा कंच हिरव्या घन राईचा कैनवास सगळ्या शहराला लाभलाय. त्यात निळ्या, तपकिरी नि ताम्बड्या रंगांची उतरती छप्पर मिरवनार्या घरांच्या रांगा म्हणजे नुसती रंगपंचमी ।

अडीच लाखाच्या आसपास शिलांग ची लोकवस्ती असून ८० टक्के साक्षरता असलेले हे शहर भारताच्या ६० टक्के साक्षर्तेच्या कितीतरी पुढे आहे । मेघालयाच्या राज्धानिच हे शहर देशातील सर्वाधिक पावसाचा हां चिमुकला प्रांत इथे वर्षातले ८ महीने पाउस । उन्हाल्यातिल कमाल तापमान २३ डिग्री

No comments: