Friday, 19 June 2009

मेघलायातिल रहिवासी

खासी किंवा गारो आणि जयंतिया काय सगल्यान्चेच इंग्रजी उच्चार अगदी अधर अस्पष्ट। खासी भाषेसाठी रोमन लिपि वापरतात त्यामुले अर्थ जरी नाही समजला तरी निदान रोमन स्पेलिंग वरून आपण उच्चार तरी करू शकू अशी माझी भोली समजूत होती पण उच्चारनाच्या फ्रंट वर विकेट जावी असे एकापेक्षा एक कठिन खासी शब्द आहेत उमंगोट आणि उमस्यु ही नद्यांची नावे काय किंवा उम्सोसुम हे शिलांग शहराच्या एक भागाचे नाव काय सारच दुर्बोध इथली नवे त्याहून ताण ही नावे ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षिण आशियाई देशात असा संभ्रम पडावा खासी नावे आपल्याला वेगळी काहीशी विचित्र वाटण स्वाभाविक आहे कारण मोन-ख्मेर या भाषा परिवारातली ही खासी आहे अस सांगतात की थाईलैंड आणि कम्बोडिया तील भाषांशी खासी भाषा मिलती जुलती आहे

No comments: