Friday, 19 June 2009

मेघालय कृष्ण मेघांच्या छायेत

पहिला ख्रिश्चन मिशनरी मेघालयाच्या पहाडातून वणवण भटकला त्याला दोन शतके पूर्ण होतील इतक या भागातील त्यांच काम जून आहे बंगालच्या सेरामपुर मिशनचा एक पादरी रेव्ह पाल याने १८१० ते १८१३ या कालात हां सम्बन्ध प्रदेश नीट अभ्यासला लिपिची उणीव लक्षात घेउन १८१३ मधेच त्यानी खासी भाषेला रोमन लिपि देण्याची कल्पना अमलात आणली अवघ्या १०-१५ वर्षात बायबल आणि न्यू टेस्टामेंट या ख्रिस्ती धर्मं ग्रंथाचा खासित अनुवाद ही करून घेतला

१८४१ मधे मेघालयात आलेला एक वेल्श मिशनरी थॉमस जोन्स याच्याकडे त्या वेळच्या ब्रिटिश सत्ताधार्यानी संपूर्ण चेरापूंजी जिल्ह्यात ख्रिस्ती मिशनरी शाला उघडण्याची कामगिरी सोपविली होती

याच कालात खासी नेता लाइ थांट याने स्वतः बंगाली भाषा शिकून आपल्या बांधवाना बंगाली लिहिण्या वाचण्यास शिकवायला सुरुवात केली होती । पण जोन्स च्या हाती शिक्षण खात एकवटल्यावर उ लाइ थांट च्या शाला बंद पडल्या मिशनर्यानि शाला काढताच सत्ताधारी ब्रिटीशानी सर्व विध्यार्थ्याना शालेत पाठवन पालकन्वर बंधनकारक केले। त्यातूनच ख्रिस्तिकरना च्या प्रक्रियेला नवी गति मिळाली

No comments: