Saturday, 28 March 2009

घुसखोरिची पार्श्वभूमी

आसामचे हे मैदानी क्षेत्र मुस्लिम बहुसंख्याक बनवण्याची 'दार-उल-इस्लाम ' ची योजना गेली ९३ वर्षे मुस्लिम नेत्यांद्वारे राबवली जात आहे। १९०६ साली ढाक्याचा नवाब सलिमुल्ला खान याने तत्कालिन भारतातील प्रमुख मुसलमान नेत्यांची बैठक बोलाऊन आसाम मधे मोठ्या प्रमाणावर मुसलमानानी जाउन स्थाईक होण्यासाठी उत्तेजन देण्याचे आवाहन केले। महम्मद अली जीना ची देखिल आसामला पूर्व पाकिस्तानात समाविष्ठ करून घेण्याची तीव्र इच्छा होती , पण ती पूर्ण न झाल्याने त्यानी आपला स्वीय सचिव मोईन उल हक़ चौधरी यास म्हटले होते , 'अजुन दहाच वर्षे थाम्ब। मी माझ्या स्वताहाच्या हाताने चांदीच्या तबकातून तुला आसामची भेट देऊ करीन।' त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी १९६८ मधे लिहिलेल्या 'मिथ ऑफ़ इन्देपेंदेंस' या पुस्तकात ते म्हणतात , 'काश्मीर हे भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारे एकच कारण नसून पूर्व पाकिस्तानाला (आताच्या बांगला देशाला ) लागुन असलेल्या भारतीय जिल्ह्यांचे कारणही तितकेच महत्वाचे आहे'

No comments: